भजनी मालिका
← भजनांकडे परत

जेथें माझी दृष्टि राहिली बैसोन । तेथें चि हें मन गुंडाळतें

jethen majhi drushti rahili baison | tethen chi hen man gundalaten

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जेथें माझी दृष्टि राहिली बैसोन । तेथें चि हें मन गुंडाळतें ॥१॥ टाळावी ते पीडा आपणापासून । दिठाविलें अन्न ओकवितें ॥ध्रु.॥ तुम्हांसी कां कोडें कोणी ये विशीचें । नवलाव याचें वाटतसे ॥२॥ तुका म्हणे वेगीं उभारा जी कर । कीर्त मुखें थोर गर्जईन ॥३॥