भजनी मालिका
← भजनांकडे परत

जेथें जेथें जासी । तेथें मज चि तूं पासी

jethen jethen jasi | tethen maj chi tun pasi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जेथें जेथें जासी । तेथें मज चि तूं पासी ॥१॥ ऐसा पसरीन भाव । रिता नाहीं कोणी ठाव ॥ध्रु.॥ चित्त जडलें पायीं । पाळती हें ठायीं ठायीं ॥२॥ तुका म्हणे पोटीं । देव घालुनि सांगें गोष्टी ॥३॥