भजनी मालिका
← भजनांकडे परत

जेणें वेळ लागे । ऐसें सांडीं पांडुरंगे

jenen vel lage | aisen sandin pandurange

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जेणें वेळ लागे । ऐसें सांडीं पांडुरंगे ॥१॥ कंठ कंठा मिळों देई । माझा वोरस तूं घेई ॥ध्रु.॥ नको पीतांबर । सांवरूं हे अळंकार ॥२॥ टाकीं वो भातुकें । लौकिकाचें कवतुकें ॥३॥ हातां पायां नको । कांहीं वेगळालें राखों ॥४॥ तुका म्हणे यावरी । मग सुखें अळंकारीं ॥५॥