भजनी मालिका
← भजनांकडे परत

जेथें जातों तेथें पडतो मतोळा । न देखिजे डोळां लाभ कांहीं

jethen jaton tethen padato matola | na dekhije dolan labh kanhin

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जेथें जातों तेथें पडतो मतोळा । न देखिजे डोळां लाभ कांहीं ॥१॥ कपाळीची रेखा असती उत्तम । तरि कां हा श्रम पावतों मी ॥ध्रु.॥ नव्हे चि तुम्हांस माझा अंगीकार । थीता संवसार अंतरला ॥२॥ भोग तंव झाला खरा भोगावा तो । भांडवल नेतो आयुष्य काळ ॥३॥ कोठें तुझी कीर्ती आइकिली देवा । मुकतों कां जीवा तुका म्हणे ॥४॥