भजनी मालिका
← भजनांकडे परत

जेणें होय हित । तें तूं जाणसी उचित

jenen hoy hit | ten tun janasi uchit

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
जेणें होय हित । तें तूं जाणसी उचित ॥१॥ मज नको लावूं तैसें । वांयां जायें ऐसें पिसें ॥ध्रु.॥ धरितोसी सत्ता । होसी सकळ जाणता ॥२॥ चतुराच्या राया । अंगीकारावें तुकया ॥३॥