भजनी मालिका
← भजनांकडे परत

तरी कां वोळंगणे । राजद्वारीं होती सुने

tari kan volangane | rajadvarin hoti sune

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तरी कां वोळंगणे । राजद्वारीं होती सुने ॥१॥ अंगीं दावुनि निष्कामता । पोकळ पोकळी ते वृथा ॥ध्रु.॥ कासया मोकळ । भोंवतें शिष्यांचे गाबाळ ॥२॥ तुका म्हणे ढाळे । बाहेर मुदे तें निराळें ॥३॥