भजनी मालिका
← भजनांकडे परत

तरीं च म्यां देवा । साटी करूनियां जीवा

tarin cha myan deva | sati karuniyan jiva

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तरीं च म्यां देवा । साटी करूनियां जीवा ॥१॥ येथें बैसलों धरणें । दृढ कायावाचामनें ॥ध्रु.॥ आवरील्या वृत्ति । मन घेउनियां हातीं ॥२॥ तुका म्हणे जरा । बाहेर येऊं नेदीं घरा ॥३॥