भजनी मालिका
← भजनांकडे परत

तंव ते म्हणे ऐका हृषीकेशी वो । नवाजिलें तुम्ही म्हणां आपणांसि वो । तरी कां वंचनुक सुमनासि वो । नट नाट्य बरें संपादूं जाणतोसि वो

tanv te mhane aika hrushikeshi vo | navajilen tumhi mhanan apanansi vo | tari kan vanchanuk sumanasi vo | nat natya baren sampadun janatosi vo

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तंव ते म्हणे ऐका हृषीकेशी वो । नवाजिलें तुम्ही म्हणां आपणांसि वो । तरी कां वंचनुक सुमनासि वो । नट नाट्य बरें संपादूं जाणतोसि वो ॥१॥ सर हो परता परता हो आतां हरी । म्हणे सत्राजिताची कुमरी । जाणतें मी या शब्दाच्या कुसरी । ऐसें च करून ठकविलें आजिवरी वो ॥ध्रु.॥ भावें गेलें म्हुण न व्हावा वियोग । मनिचे आर्त जन्मांतरीं व्हावा संग । तों तों केलें हें पाठमोरें जग । ऐसें काय जाणें वो तुझे रंग ॥२॥ काय करूं या नागविलें कामें । लागलें तयास्तव इतुकें सोसावें । नाहीं तरी कां नव्हती ठावीं वर्में । परद्वारीं ऐसा हाकलिती प्रसिद्ध नांवें वो ॥३॥ काय किती सांगावे तुझे गुण । न फुटे वाणी ऐसा निष्ठुर निर्गुण । आप पर न म्हणसी माय बहीण । सासूसुनास लावुनि पाहासी भांडण वो ॥४॥ इतुकियावरी म्हणे वैकुंठिंचा राणा । होऊन गेलें तें नये आणूं मना । आतां न करीं तैसें करी क्रिया आणा । भक्तवत्सल म्हणे तुकयाबंधु कान्हा वो ॥५॥