भजनी मालिका
← भजनांकडे परत

तरी सदा निर्भर दास । चिंताआसविरहित

tari sada nirbhar das | chintaasavirahit

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
तरी सदा निर्भर दास । चिंताआसविरहित ॥१॥ अवघाच एक ठाव । सर्व भाव विठ्ठलीं ॥ध्रु.॥ निरविलें तेव्हां त्यास । जाला वास त्यामाजी ॥२॥ तुका म्हणे रूप ध्यावें । नाहीं ठावे गुणदोष ॥३॥