भजनी मालिका
← भजनांकडे परत

ठेवा जाणीव गुंडून । येथें भाव चि प्रमाण

theva janiv gundun | yethen bhav chi praman

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ठेवा जाणीव गुंडून । येथें भाव चि प्रमाण ॥१॥ एका अनुसरल्या काज । अवघें जाण पंढरिराज ॥ध्रु.॥ तर्कवितर्कासी । ठाव नलगे सायासीं ॥२॥ तुका म्हणे भावेंविण । अवघा बोलती तो सीण ॥३॥