भजनी मालिका
← भजनांकडे परत

टाळ दिंडी हातीं । वैकुंठींचे ते सांगाती

tal dindi hatin | vaikunthinche te sangati

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
टाळ दिंडी हातीं । वैकुंठींचे ते सांगाती ॥१॥ जाल तरी कोणा जा गा । करा सिदोरी ते वेगा ॥ध्रु.॥ जाती सादावीत । तेथें असों द्यावें चित्त ॥२॥ तुका म्हणे बोल । जाती बोलत विठ्ठल ॥३॥