भजनी मालिका
← भजनांकडे परत

ठकिलें काळा मारिली दडी । दिली कुडी टाकोनियां

thakilen kala marili dadi | dili kudi takoniyan

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
ठकिलें काळा मारिली दडी । दिली कुडी टाकोनियां ॥१॥ पांघुरलों बहु काळें । घोंगडें बळें सांडवलें ॥ध्रु.॥ नये ऐसा लाग वरी । परते दुरी लपालें ॥२॥ तुका म्हणे आड सेवा । लाविला हेवा धांदली ॥३॥