भजनी मालिका
← भजनांकडे परत

झेला रे झेला वरचेवरी झेला । हातिचें गमावी तो पाठीं साहे टोला

jhela re jhela varachevari jhela | hatichen gamavi to pathin sahe tola

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
झेला रे झेला वरचेवरी झेला । हातिचें गमावी तो पाठीं साहे टोला ॥१॥ त्रिगुणाचा चेंडू हातें झुगारी निराळा । वरीलिया मुखें मन लावी तेथें डोळा ॥ध्रु.॥ आगळा होऊनि धरी वरीचिया वरी । चपळ तो जिंके गांढ्या ठके येरझारीं ॥२॥ हातीं सांपडलें उभें बैसों नेदी कोणी । सोरीमागें सोरी घेती ओणवें करूनि ॥३॥ डाई पडिलिया सोसी दुःखाचे डोंगर । पाठीवरी भार भोंवता ही उभा फेर ॥४॥ तुका म्हणे सुख पाहे तयाचें आगळें । जिंकी तो हरवी कोणी एका तरी काळें ॥५॥