भजनी मालिका
← भजनांकडे परत

टाळघोळ सुख नामाचा गजर । घोषें जेजेकार ब्रह्मानंदु

talaghol sukh namacha gajar | ghoshen jejekar brahmanandu

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
टाळघोळ सुख नामाचा गजर । घोषें जेजेकार ब्रह्मानंदु॥१॥ गरुडटके दिंडी पताकांचे भार । आनंद अपार ब्रह्मादिकां॥ध्रु.॥ आनंदें वैष्णव जाती लोटांगणीं । एक एकाहुनि भद्रजाति ॥२॥ तेणें सुखें सुटे पाषाणां पाझर । नष्ट खळ नर शुद्ध होती ॥३॥ तुका म्हणे सोपें वैकुंठवासी जातां । रामकृष्ण कथा हे ची वाट ॥४॥