भजनी मालिका
← भजनांकडे परत

झालों स्वयें कृष्ण आठव हाचित्ती । भेद भयवृत्ति उरली आहे

jhalon svayen krushna athav hachitti | bhed bhayavrutti urali ahe

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
झालों स्वयें कृष्ण आठव हाचित्ती । भेद भयवृत्ति उरली आहे ॥१॥ उरली आहे रूप नांव दिसे भिन्न । मी आणि हा कृष्ण आठवतो ॥२॥ तोंवरी हा देव नाहीं तयापासीं । आला दिसे त्यासि तोचि देव ॥३॥ देवरूप त्याची दिसे वरी काया । अंतरीं तो भयाभीत भेदें ॥४॥ भेदें तुका म्हणे अंतरे गोविंद । साचें विण छंद वांयां जाय ॥५॥