भजनी मालिका
← भजनांकडे परत

डोई वाढवूनि केश । भूतें आणिती अंगास

doi vadhavuni kesh | bhuten aniti angas

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
डोई वाढवूनि केश । भूतें आणिती अंगास ॥१॥ तरी ते नव्हति संतजन । तेथें नाहीं आत्मखुण ॥ध्रु.॥ मेळवूनि नरनारी। शकुन सांगती नानापरी ॥२॥ तुका म्हणे मैंद । नाहीं त्यापासीं गोविंद ॥३॥