भजनी मालिका
← भजनांकडे परत

टिळा टोपी उंच दावी । जगीं मी एक गोसावी

tila topi unch davi | jagin mi ek gosavi

रचनाकार: संत तुकाराम · अभंग
टिळा टोपी उंच दावी । जगीं मी एक गोसावी ॥१॥ अवघा वरपंग सारा । पोटीं विषयांचा थारा ॥ध्रु.॥ मुद्रा लावितां कोरोनि । मान व्हावयासी जनीं ॥२॥ तुका म्हणे ऐसे किती । नरका गेले पुढें जाती ॥३॥