भजनी मालिका
संत नामदेव

संत नामदेव

विठ्ठलभक्त संत-कवी; कीर्तन परंपरेचे प्रवर्तक.

संत नामदेवांनी मराठी व हिंदीत अभंग रचले. त्यांनी भागवत धर्माचा प्रसार पंजाबपर्यंत केला; त्यांची काही पदे गुरु ग्रंथ साहिबमध्ये आहेत.

या संतांची भजने

जड हेंचि खळे आयुष्याची रासी । काळ माप रसी मवीतसे ॥१॥ माप तें लागलें माप तें लागलें । मात तें लागलें झडा झडा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

जन तुम्ही करारे उदीम । वाचे स्मरा नारायण । तो तुम्हां चुकवील जन्ममरण । मायाभ्रमण चुकवील ॥१॥ तारुं करुनी शरिराचें । केणें भरिलें हरिनामाचें । शिड उभविलें सत्त्वाचें । वल्हें पडती धर्माचें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

जनचिया बोले करी नित्य काम । वसवी तिचें धाम लक्ष्मीसी ॥१॥ जनीचिया गोष्टी प्रेम ज्याचे मनीं । तयाचें चरणीं ओढवी माथा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

जननिये जिवलगे येवो पांडुरंगे । शिणलों भेटि दे गे एक वेळां ॥१॥ त्राहे त्राहे त्राहे कृपादृष्टीं पाहे । येऊनियां राहे ह्रदयामाजीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

जनिता जीवविता सर्वज्ञ प्रतिपाळिता । आडणी सांभाळितां चराचरीं ॥१॥ एक पांडुरंग दुजा नाहीं चांग । म्हणुनि याचा संगा धरिला माते ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

जनींचें बोलणें वाची नित्य कोणी । तयाचे आंगणीं तिष्ठतसे ॥१॥ जनीचिया पदां आखंडित गाये । तयाचे मी पाये वंदी माथां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

जनीनें बोलिलें तैसेंच लिहिलें । साद्य परिसिलें तुम्हीं संती ॥१॥ अहो ज्ञानदेवा असावें तुम्हा ठावें । येणें काय लहाणीव आणिली आम्हां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

जन्म गेले याचे राखतां गाई । याचिया बोला वि-श्वास काई ॥१॥ गोधनें राखितो आपण पेंढारा । तुझ्यानी मिळती पाणियाचा थारा ॥२॥

रचनाकार: संत नामदेव