भजनी मालिका
← भजनांकडे परत

जनिता जीवविता सर्वज्ञ प्रतिपाळिता । आडणी सांभाळितां चराचरीं

janita jivavita sarvadnya pratipalita | adani sambhalitan characharin

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जनिता जीवविता सर्वज्ञ प्रतिपाळिता । आडणी सांभाळितां चराचरीं ॥१॥ एक पांडुरंग दुजा नाहीं चांग । म्हणुनि याचा संगा धरिला माते ॥२॥ माझी तुज कांहीं करणें नलगे चिंता । मज आहे पोसिता पांडुरंग ॥३॥ हा शराणागतांचा जाणे कळवळा । हा पैं कळिकाळा पाहों नेदी ॥४॥ केले कोटिवरी न मानी अपराध । हें पैं साजे ब्रीद पांडुरंगा ॥५॥ आम्ही आपुल्या सुखें असो भलत्या ठायीं । प्रीति तया पाय़ीं जडली असे ॥६॥ तेणें उपकारें न विसंबे क्षण । हातीं सुदर्शन घेऊनि उभा ॥७॥ जाणतां नेणतां राम गावों गीतीं । जन्माची विश्रांति होय जेणें ॥८॥ ऐसी जिवलग होईल कैंचें आन । संचला परिपूर्ण सर्वांठायीं ॥९॥ इष्टमित्र बंधु सज्जन सोयरा । माझिया संसारा हाचि एक ॥१०॥ नामा म्हणे माते मज न चले मोहोपिसें । तुम्हांसि मज ऐसें होईल काई ॥११॥