भजनी मालिका
← भजनांकडे परत

जनजसवंत भला । देवत याचे घरा गेला

janajasavant bhala | devat yache ghara gela

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जनजसवंत भला । देवत याचे घरा गेला ॥१॥ येऊन राहातो चाकरी । पोटा मागतो भाकरी ॥२॥ स्त्री वाढावया गेली । वरचेवर विठठल झेली ॥३॥ काम सांगा सहज कांहीं । करितों मी लवलाहीं ॥४॥ मागें उरों नेदी कांहीं । कशाला गे माणुस बाई ॥५॥ दुबळ्याचे घरची नागवण । भाग्या घरची सांठवण ॥६॥ शेतांतील काम करी । विठो माझा नांगर धरी ॥७॥ खुटें पालख्या तोडी । साठ चाहुर पाणा झोडी ॥८॥ देव लाकडांसी गेला । परत घेवूनियां आला ॥९॥ पांचा साता गांवा गेला । लेंकी सुना घेऊन आला ॥१०॥ खांद्यावरी आणिल्या पाहीं । नवल याचें सांगों काइ ॥११॥ मायलेंकी केल्या भेटी । ऐशा विठोबाच्या गोष्टी ॥१२॥ कैसा प्रगटरे झाला । विठो माझा निघोन गेला ॥१३॥ आठवा आठवा माझा सखा । नामा सांगे सर्व लोकां ॥१४॥