भजनी मालिका
← भजनांकडे परत

जननी बाळकांचें जीवन । जरी तें नेणे भूकतहान

janani balakanchen jivan | jari ten nene bhukatahan

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जननी बाळकांचें जीवन । जरी तें नेणे भूकतहान ॥१॥ तरी तें कशानें बांचती । विचारावें कमळापती ॥२॥ वत्सालागी तान्हीं । लागूं नेदी आपुल्या स्तनीं ॥३॥ कूर्मी आपुलिया बाळा । नाव लोकीं वेळोवेळां ॥४॥ विठा म्हणे जगज्जीवना । आतां नुपेक्षावें दीना ॥५॥