भजनी मालिका
← भजनांकडे परत

जनचिया बोले करी नित्य काम । वसवी तिचें धाम लक्ष्मीसी

janachiya bole kari nitya kam | vasavi tichen dham lakshmisi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जनचिया बोले करी नित्य काम । वसवी तिचें धाम लक्ष्मीसी ॥१॥ जनीचिया गोष्टी प्रेम ज्याचे मनीं । तयाचें चरणीं ओढवी माथा ॥२॥ महेशादिदेव तेहि तया ध्याती । जे आवडे गाती जनी ध्याती ॥३॥