भजनी मालिका
← भजनांकडे परत

जन तुम्ही करारे उदीम । वाचे स्मरा नारायण । तो तुम्हां चुकवील जन्ममरण । मायाभ्रमण चुकवील

jan tumhi karare udim | vache smara narayan | to tumhan chukavil janmamaran | mayabhraman chukavil

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जन तुम्ही करारे उदीम । वाचे स्मरा नारायण । तो तुम्हां चुकवील जन्ममरण । मायाभ्रमण चुकवील ॥१॥ तारुं करुनी शरिराचें । केणें भरिलें हरिनामाचें । शिड उभविलें सत्त्वाचें । वल्हें पडती धर्माचें ॥२॥ आत्मयांची करुनी कुवे काठी । वारा लागतो जगजेठी । तारूं चाले थोरा नेटी । विठ्ठल भेटी पंढरीये ॥३॥ तारवा सांपडलें बंदर । राया विठोबाचें नगर । तें बा संताचें माहेर । विष्णुदास म्हणे नामा ॥४॥