भजनी मालिका
← भजनांकडे परत

जगीं विठ्ठल रुक्मिणी । तुम्ही अखंड स्मरा ध्यानी

jagin viththal rukmini | tumhi akhand smara dhyani

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जगीं विठ्ठल रुक्मिणी । तुम्ही अखंड स्मरा ध्यानी ॥१॥ मग तुज काय उणें । झालें सोयरे त्रिभुवनें ॥२॥ साराचें जें सार । भवसिंधु उतरी पार ॥३॥ मन ठेउनी चरणीं । म्हणे नामयाची जनी ॥४॥