भजनी मालिका
संत नामदेव

संत नामदेव

विठ्ठलभक्त संत-कवी; कीर्तन परंपरेचे प्रवर्तक.

संत नामदेवांनी मराठी व हिंदीत अभंग रचले. त्यांनी भागवत धर्माचा प्रसार पंजाबपर्यंत केला; त्यांची काही पदे गुरु ग्रंथ साहिबमध्ये आहेत.

या संतांची भजने

चांगदेव योगी निष्काम चांगला । स्वरूपीं रंगला केशवाच्याअ ॥१॥ सुगंध अक्षता पुष्पें परिमल । पूजिले सकळ साधुसंत ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

चांगा वतेश्वर मुक्ता निवृत्तीश्वर । सावंत कुंभार ऐहिक ते ॥१॥ एके ठायीं मिळाले परब्रह्म गवसून । वटेश्वर सोपान मध्यभागीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

चातुर्यसागरा आमुची जननी । जाणते रुक्मिणी प्रेम-कळा ॥१॥ चरणींची प्रभा जाणे मणिग्रीव । नकुळ वैष्णव सखे माझे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

चांदणें नावडे चोरा । सद्‍बुद्धि नावडे रांडेच्या पोरा । वृक्ष नावडे कुंजरा । सत्य कुचरा नावडे ॥१॥ चंदन जाणावा सुगं-धाची धृति । कर्पूर जाणावा उत्तम याति । हंस जाणावा चालतिये गति । कोकिळ श्रुति ओळखावी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

चारी वेद गात जयासी अखंड । नेणवे प्रचंड कीर्ति ज्याची ॥१॥ तोचि भीमातीरीं उभा दिगंबर । ठेवी कटीं कर भक्तांसाठी ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

चारी वेद तुझ्या नांदती नगरीं । तेथें मी भिकारी काय वानूं ॥१॥ वर्णितां पार नेणे चतुरानन । तेथें मी अज्ञान काय जाणें ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

चारी वेदां ज्याचा नयेचि उमज । करीतसे मुंज वसु-देव ॥१॥ कर्दळीचे स्तंभें वाडे शृंगारिले । गर्गासी धाडिलें आणा-वया ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

चालली ते यात्रा गेली द्वारकेसी । करूनि स्नानासी नगरामध्यें ॥१॥ पहावया घर दुकान हुंडीचें । न दिसे हो साचें तत्क्षणीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

चालियेलं तेव्हां गडी आणि देव । खेळताती सर्व आनंदानें ॥१॥ वत्साचिया वेषें वत्सासूर आला । माराया कृष्णाला परीक्षिती ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

चालिला देवाचे भेटीला सन्मुख । ब्राम्हणाचा हरिख न समाये ॥१॥ पाहातां लोचनीं राजीवलोचन । भावाचे मोचन तेचि काळीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

चालिले घेऊनि देव ऋषीश्वरा । आवघियां पुढारां गरुडदेव ॥१॥ दिवसानुदिवस चालिले सत्वर । पहावें गोदातीर म्हणोनियां ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

चालिलें बाळक रुदन करीत । देखोनी गांवांत हाहा: कार ॥१॥ पाहा हें रायानें मांडिलें अनुचित । कासया तो भ्रांत झाला नेणों ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

चाळक माझें मन पांगुळ पैं झालें । साक्षात्कारें मन हारपोनी गेलें ॥१॥ मन हारपलें करूं आतां काय । पहावया गेलें तंव परतोनी कांही नये ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

चिंतातुर देहीं न साहे काजळी । नामाची पाजळी उभय दिवीं ॥१॥ प्रकाश पडेल ब्रह्म हें दिसेल । वैकुंठ जोखेल भजनभक्तीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

चिदानंद चिद्रूप चित्त चिन्मय । बाळ यशोदेचें आनंद अद्वय ॥१॥ सत्य अभिनव सुख याच्या दर्शनीं । मिठी पडली पाहतां रूप नययीं ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

चिदानंद दोंदिल बाळ डोळस । कृष्ण खेळवीत निवे मानस ॥१॥ सये आन कांहीं या जीवा नावडे । चित्त गुंतलें तया सुखी न निवडे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

चिदानंद दोंदिल बाळ सांवळें । कृष्ण पाहतां नयनीं मन मावळे ॥१॥ तें सुख कवणें वाचें बोलिजे । चित्त चैतन्य समरसें भोगीजे ॥२॥

रचनाकार: संत नामदेव

चिदानंदघन चिन्मय बाळकृष्ण । खेळवितां मन होय उन्मन ॥१॥ सुख अनुभवी अनुवाद खुंटला । विश्वंभरीं तोचि अनुवाद गोठला ॥२॥

रचनाकार: संत नामदेव