भजनी मालिका
← भजनांकडे परत

चालिले घेऊनि देव ऋषीश्वरा । आवघियां पुढारां गरुडदेव

chalile gheuni dev rushishvara | avaghiyan pudharan garudadev

रचनाकार: संत नामदेव · अभंग
चालिले घेऊनि देव ऋषीश्वरा । आवघियां पुढारां गरुडदेव ॥१॥ दिवसानुदिवस चालिले सत्वर । पहावें गोदातीर म्हणोनियां ॥२॥ धन्य गोदातीर धन्य कचेश्वर । जाती ऋषीवर स्नानालागीं ॥३॥ सारा पौष मास गेला कचेश्वरीं । नित्य गंगातीरीं स्नानसंध्या ॥४॥ पाहिला कचेश्वर पाहिली ती गोदा । आली प्रतिपदा माघमास ॥५॥ नामा म्हणे देवा जावें पुण्यस्तंभा । मनोहर जागा सिद्धेश्वर ॥६॥