भजनी मालिका
← भजनांकडे परत

चिदानंद दोंदिल बाळ सांवळें । कृष्ण पाहतां नयनीं मन मावळे

chidanand dondil bal sanvalen | krushna pahatan nayanin man mavale

रचनाकार: संत नामदेव · अभंग
चिदानंद दोंदिल बाळ सांवळें । कृष्ण पाहतां नयनीं मन मावळे ॥१॥ तें सुख कवणें वाचें बोलिजे । चित्त चैतन्य समरसें भोगीजे ॥२॥ परा परतली पश्यंति तन्मया । मध्यमा वैखरी पावली हो लया ॥३॥ आलिंगना लागुनी बाम्हा स्फुरती । देह न दिसे पाहतां कृष्णमूर्ति ॥४॥ तेथें आर्तीचा आनंदू गोठला । तो हा कृष्णरूपें अंकूर उठिला ॥५॥ नामया स्वामी सबाह्याभ्यंतरीं । गेले रसरंग गोकुळाभीतरीं ॥६॥