भजनी मालिका
← भजनांकडे परत

चाळक माझें मन पांगुळ पैं झालें । साक्षात्कारें मन हारपोनी गेलें

chalak majhen man pangul pain jhalen | sakshatkaren man haraponi gelen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
चाळक माझें मन पांगुळ पैं झालें । साक्षात्कारें मन हारपोनी गेलें ॥१॥ मन हारपलें करूं आतां काय । पहावया गेलें तंव परतोनी कांही नये ॥२॥ भक्ति ज्ञान वैराग्य नोहे । अवघेंचि आहे अवघें तो आहे ॥३॥ नामा ह्मणे जनाबाई आहे बो कैसा । बाबा उदकीं घट बुडोनी ठेला जैसा ॥४॥