भजनी मालिका
← भजनांकडे परत

चालिलें बाळक रुदन करीत । देखोनी गांवांत हाहा: कार

chalilen balak rudan karit | dekhoni ganvant haha: kar

रचनाकार: संत नामदेव · अभंग
चालिलें बाळक रुदन करीत । देखोनी गांवांत हाहा: कार ॥१॥ पाहा हें रायानें मांडिलें अनुचित । कासया तो भ्रांत झाला नेणों ॥२॥ देवोनियां रत्न घेतला चिंचोका । दिला कवडी एका चिंतामणी ॥३॥ कामधेनु नेधे पोशीले बोकड । अस्पदे माकड पाळावया ॥४॥ कल्पतरु मोडी शेतां कुंपण करी । तैसी झाली परी आजीची हे ॥५॥ नामा म्हणे तिचा मोह हा दारुण । राजा ती आधीन झाला तैसा ॥६॥