भजनी मालिका
← भजनांकडे परत

चिदानंद चिद्रूप चित्त चिन्मय । बाळ यशोदेचें आनंद अद्वय

chidanand chidrup chitta chinmay | bal yashodechen anand advay

रचनाकार: संत नामदेव · अभंग
चिदानंद चिद्रूप चित्त चिन्मय । बाळ यशोदेचें आनंद अद्वय ॥१॥ सत्य अभिनव सुख याच्या दर्शनीं । मिठी पडली पाहतां रूप नययीं ॥२॥ द्दष्टीया डोळिया आड रिघोनी । तनु मनासी केली भुलवणी ॥३॥ आंत बाहेरी निज सुख वावरे । नित्य नूतन जीववूनी विसरे ॥४॥ आपरूपीं रूप सकळां केलें । गोपी गोपाळां धेनु वत्सां भुलविलें ॥५॥ नामया स्वामी आनंद उदधि । माजी बुडोनियां नेली देहबुद्धि ॥६॥