भजनी मालिका
← भजनांकडे परत

चांगदेव योगी निष्काम चांगला । स्वरूपीं रंगला केशवाच्याअ

changadev yogi nishkam changala | svarupin rangala keshavachyaa

रचनाकार: संत नामदेव · अभंग
चांगदेव योगी निष्काम चांगला । स्वरूपीं रंगला केशवाच्याअ ॥१॥ सुगंध अक्षता पुष्पें परिमल । पूजिले सकळ साधुसंत ॥२॥ राही रखमाई आणि पांडुरंग । पूजियले सांग चांगदेवें ॥३॥ पूजिली मुक्ताई सद्‌गुरु निवृत्ति । आणिक विभूति गौरविले ॥४॥ नामा म्हणे आतां नका राहूं स्थिर । होईल उशीर समाधीसी ॥५॥