भजनी मालिका
← भजनांकडे परत

चालियेलं तेव्हां गडी आणि देव । खेळताती सर्व आनंदानें

chaliyelan tevhan gadi ani dev | khelatati sarva anandanen

रचनाकार: संत नामदेव · अभंग
चालियेलं तेव्हां गडी आणि देव । खेळताती सर्व आनंदानें ॥१॥ वत्साचिया वेषें वत्सासूर आला । माराया कृष्णाला परीक्षिती ॥२॥ पाहोनियां ऐसें तयासी मारिलें । झोंकोनियां दिल्हें आकाशातें ॥३॥ चला आतां जेवूं बसूं एके ठायीं । काढारे लव-लाही शिदोरीया ॥४॥ गोपाळ मिळोनी आनंदें जेविले । ब्रह्मरस धाले कृष्णासंगें ॥५॥ उदक प्राशन करावया आले । बकानें देखिलें कृष्णजीला ॥६॥ दुष्टबुद्धि तेव्हां देवासी गिळीत । ह्लदय जळत उगळीला ॥७॥ धरूनियां हातें उभाची चिरीला । आनंद देवाला न समाये ॥८॥ नामा ह्मणे आले घरासी सकळ । सांगताती बाळ वर्तमान ॥९॥