भजनी मालिका
← भजनांकडे परत

चांदणें नावडे चोरा । सद्‍बुद्धि नावडे रांडेच्या पोरा । वृक्ष नावडे कुंजरा । सत्य कुचरा नावडे

chandanen navade chora | sad‍buddhi navade randechya pora | vruksha navade kunjara | satya kuchara navade

रचनाकार: संत नामदेव · अभंग
चांदणें नावडे चोरा । सद्‍बुद्धि नावडे रांडेच्या पोरा । वृक्ष नावडे कुंजरा । सत्य कुचरा नावडे ॥१॥ चंदन जाणावा सुगं-धाची धृति । कर्पूर जाणावा उत्तम याति । हंस जाणावा चालतिये गति । कोकिळ श्रुति ओळखावी ॥२॥ लांव जाणावी उफराटिये दृष्टी । क्रोधी जाणावा भोंवयांसीं गांठी । लटिक्या जाणा बहुता गोष्टी । नष्ट कुचेष्ठी ओळखावा ॥३॥ नारी जाणावी भ्रतारभक्ति । आचारें जाणावी महा सति । धनुर्धर जाणावा संधान युक्ति । संत तापसीं ओळखावा ॥४॥ जयीं घातलिया निघे खरा । ज्ञान जाणे तोचि च-तुरा । शिंदळी जाणावी नीच उत्तरा । कुसळी घरोघरा फिरतसे ॥५॥ इतुकिया बोलाची न मानावी खंति । विठ्ठलचरणीं ठेवूनियां मति । प्रसन्न होईल लक्ष्मीपति । ह्मणे विष्णुदास नामा ॥६॥