भजनी मालिका
← भजनांकडे परत

जनी जाय पाणीयासी । मागें धांवे हृषिकेशी

jani jay paniyasi | magen dhanve hrushikeshi

रचनाकार: संत नामदेव · अभंग
जनी जाय पाणीयासी । मागें धांवे हृषिकेशी ॥१॥ पाय भिजों नेदी हात । माथां घागरी वहात ॥२॥ पाणी रांजणांत भरी । सडासारवण करी ॥३॥ धुणें धुऊनियां आणी । म्हणे नाम याची जनी ॥४॥