भजनी मालिका
संत एकनाथ

संत एकनाथ

सोळाव्या शतकातील पैठणचे संत; एकनाथी भागवत व भारुडांचे कर्ते.

संत एकनाथांनी एकनाथी भागवत, भावार्थ रामायण आणि लोकशिक्षण देणारी अनेक भारुडे रचली. त्यांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली.

या संतांची भजने

भवभयनाशक रामनाम तारक । शंकर राजा सुख जाणतसे ॥१॥ योगयाग नको आणिक साधनें । नामपरतें पेणें आणिक नाहीं ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भवरोगियांसी औषध हें नाम । सेवावे परम आवडीनें ॥१॥ सर्वकाळ करा नामाचें चिंतन । सदा समाधान होय तेणें ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भवसिंधु तराया नाम हें नौका । उतार तें लोका सोपा केली ॥१॥ न घडे न घडे आणिक साधन । नाम पंचानन नाम पुरे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भागीरथी आणि भीमरथी वदतां । समान तत्वतां कलीमाजीं ॥१॥ प्रातःकाळीं नमस्मरण जो गाय । तीर्थीं सदा न्हाये पुण्य जोडे ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भाग्यांचें भाग्य धन्य तें संसारीं । सांठविती हरि हृदयामाजीं ॥१॥ धन्य त्यांचें कुळ धन्य त्याचें कर्म । धन्य त्याचा स्वधर्म नाम मुखा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भांबावला देव संतामागें धावें । उघडाचि प्रभवे पंढरीये ॥१॥ युगें अठ्ठावीस पुंडलिकासाठीं । उभा जगजेठी विटेवर ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ

भांबावले जन म्हणती माझें माझें । वाउगेंचि वोझें वाहताती ॥१॥ खराचिये परी उकरडा सेविती । नोहे तयां गती अधम जाणा ॥२॥

रचनाकार: संत एकनाथ