भजनी मालिका
← भजनांकडे परत

भलते भावें शरण येतां । निवारी जन्ममरण चिंता

bhalate bhaven sharan yetan | nivari janmamaran chinta

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भलते भावें शरण येतां । निवारी जन्ममरण चिंता । उदार लक्ष्मीचा दाता । साक्ष पुंडलीक करुनी सांगे ॥१॥ येथें या रे लहान थोर । भावें नारी अथवा नर । मोक्षाचा विचार नकरणें कवणाही ॥२॥ एका दरुशनें मुक्ति । पुन्हां नाहीं जन्मावृत्ती । एका जनार्दनीं चित्तीं । सदोदित तें सुख ॥३॥