भजनी मालिका
← भजनांकडे परत

भवरोगासी वोखद । रामनाम हेंचि शुद्ध

bhavarogasi vokhad | ramanam henchi shuddha

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भवरोगासी वोखद । रामनाम हेंचि शुद्ध ॥१॥ येणे तुटे रोग व्यथा । भुक्ति मुक्ति वंदिती माथा ॥२॥ न लगे आणिकाचे काम । वाचे वंदें रामनाम ॥३॥ पथ्य एक शुद्ध क्रिया । एका जनार्दनीं लागे पायां ॥४॥