भजनी मालिका
← भजनांकडे परत

भवभयनाशक रामनाम तारक । शंकर राजा सुख जाणतसे

bhavabhayanashak ramanam tarak | shankar raja sukh janatase

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भवभयनाशक रामनाम तारक । शंकर राजा सुख जाणतसे ॥१॥ योगयाग नको आणिक साधनें । नामपरतें पेणें आणिक नाहीं ॥२॥ कालीमाजीं श्रेष्ठ रामनाम निज । यापरतें बीज आणिक नाहीं ॥३॥ एका जनार्दनीं नाम तारक थोर । तुटे वेरझार रामनामें ॥४॥