भजनी मालिका
← भजनांकडे परत

भाग्याचा उदय झाला । संतसंग मज घडला

bhagyacha uday jhala | santasang maj ghadala

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भाग्याचा उदय झाला । संतसंग मज घडला ॥१॥ तेंणें आनंदाचे पुर । लोटताती निरंतर ॥२॥ प्रेम सप्रेम भरतें । अंगी उतार चढते ॥३॥ आली आनंदलहरी । एका जनार्दनीं निर्धारीं ॥४॥