भजनी मालिका
← भजनांकडे परत

भाग्यवंत श्रीहरीचे दास । धरितां कास तारिती

bhagyavant shrihariche das | dharitan kas tariti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भाग्यवंत श्रीहरीचे दास । धरितां कास तारिती ॥१॥ धन्य त्यांचा उपकार । पावविले पार बहुत ॥२॥ वर्णितां त्यांचें उत्तम गुण । होय जन्मांचेंखंडन ॥३॥ शरण एका जनार्दनीं । धन्य धन्य तुमची वाणी ॥४॥