भजनी मालिका
← भजनांकडे परत

भांबावले जन म्हणती माझें माझें । वाउगेंचि वोझें वाहताती

bhambavale jan mhanati majhen majhen | vaugenchi vojhen vahatati

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भांबावले जन म्हणती माझें माझें । वाउगेंचि वोझें वाहताती ॥१॥ खराचिये परी उकरडा सेविती । नोहे तयां गती अधम जाणा ॥२॥ स्तंभ असोनियां चोर म्हणती आला । नसोनि प्रपंच खरा भासिला ॥३॥ मृगजळवत् जाणार सर्व । अभ्रीचें सावेव वायां जैसें ॥४॥ एका जनार्दनीं धरीका रे सोय । पुनरपि न ये गर्भवासा ॥५॥