भजनी मालिका
← भजनांकडे परत

भाग्यवंत होती संत । दीन पतीत तारिती

bhagyavant hoti sant | din patit tariti

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भाग्यवंत होती संत । दीन पतीत तारिती ॥१॥ उपदेश विठ्ठल मंत्र । देती सर्वत्र सारिखा ॥२॥ स्त्रिया शुद्र अथवा बाळें । कृपा कल्लोळे एकचि ॥३॥ एका जनार्दनीं शरण । पतीतपावन संत होती ॥४॥