भजनी मालिका
← भजनांकडे परत

भांडाचें तोंड भांड पुराण । वरी शिमग्याचा सण

bhandachen tond bhand puran | vari shimagyacha san

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भांडाचें तोंड भांड पुराण । वरी शिमग्याचा सण ॥१॥ काय उणें मग भांडा । बोलती वाउगें तें तोंडा ॥२॥ वेद शास्त्र नीति नाहीं । सैरावैरा बोलणें पाहीं ॥३॥ एका जनार्दनीं पाषांड । म्हणोनि फोडो त्याचें तोंड ॥४॥