भजनी मालिका
← भजनांकडे परत

भांबावला देव संतामागें धावें । उघडाचि प्रभवे पंढरीये

bhambavala dev santamagen dhaven | ughadachi prabhave pandhariye

रचनाकार: संत एकनाथ · अभंग
भांबावला देव संतामागें धावें । उघडाचि प्रभवे पंढरीये ॥१॥ युगें अठ्ठावीस पुंडलिकासाठीं । उभा जगजेठी विटेवर ॥२॥ यावे तया द्यावें क्षेमालिंगन । पुसावा तो शिणभाग त्यास ॥३॥ कुर्वाळुनी करें धरी हनुवटी । म्हणे मजसी भेटी तुमची झाली ॥४॥ लाघव तयासी दावी आपुले बळें । पुरवावे लळे सत्य त्याचे ॥५॥ जैशी त्याची भावना आपण पुरवी । एका जनार्दनीं गोंवी आपल्या कडे ॥६॥