भजनी मालिका
संत निळोबा

संत निळोबा

या संतांची भजने

ते म्हणती रे हे सुरपतीची । पूजा आजी देवदेवाची । उच्छिष्ट करुं नये हे कुळींची । आली पध्दति चालत ॥१॥ ऐंसे एकोनियां गोवळ । धांविले जैसे कृतांतकाळ । कावडी हिरोनियां सकळ । आणिल्या त्या हरिपाशीं ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

तेणें दणणिंले गोकुळ उतरंडीहि खचल्या सकळ ॥ धांविन्नले गौळी आणि गोवळ । म्हणती हा रवकल्लोळ कशाचा ॥१॥ तंव ते देखती अवघे नयनीं । वृक्ष पडिले ते उन्मळोनी । आश्रचर्य करिती आपुलाले मनीं । म्हणती हे कैसेनी उलंडले ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

तैशींच वत्सें जिची जेसीं । होतीं होउनी ठेला तैसीं । बांडीं खैरीं मोरी जांबुळसीं । तांबडी धवळी कपिलवणें ॥१॥ बुजगीं मिसकिणें लातिरीं । ऐके खविरीं डिंबिरीं । एके अचपळें काविरीं । झाला श्रीहरी सर्व रुपें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

त्याचिपरि हा मुरारी । पसरला न दिसेचि ऐसा दुरी । चालतू उदगाचिया परी । तो असुरी लक्षित ॥१॥ येतां देखोनियां कृष्णासी । दैत्य हारीखला मानसीं । म्हणे साधूनियां निजकार्यांसी । जाईन अति त्वरेंसी उडोनियां ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

त्याचिमाजीं होतीं जाती । जीव त्या नेणती आत्मया ॥१॥ नवल याची लाघवी माया । यातें नेदेऊनियां विस्तारें ॥२॥

रचनाकार: संत निळोबा

त्रास उपजे माझिया मना । अवलोकितां त्यांच्या वदना ॥१॥ जे या दुषिती नामासी । कृत्रिम करिती उपदेशासी ॥२॥

रचनाकार: संत निळोबा