झगमगी काजवे । रात्रीं दिवसां नव्हे ठावें
jhagamagi kajave | ratrin divasan navhe thaven
झगमगी काजवे । रात्रीं दिवसां नव्हे ठावें ॥१॥ म्हणोनियां न ये मोला । नाश पदरीं असे त्याला ॥२॥
jhagamagi kajave | ratrin divasan navhe thaven
झगमगी काजवे । रात्रीं दिवसां नव्हे ठावें ॥१॥ म्हणोनियां न ये मोला । नाश पदरीं असे त्याला ॥२॥
jhala virah antari kaminisi | na ye sangatan bolatan konapasi | mukh sukalen vo tapali visheshi | ang kape tenen jhali kasavisi vo
झाला विरह अंतरी कामिनीसी । न ये सांगतां बोलतां कोणापासी । मुख सुकलें वो तापली विशेषी । आंग कापे तेणें झाली कासाविसी वो ॥१॥ हदई आठवे रीरंगसावळा । मनचि गुंतलें तयापासिं डोळा । कोण आणिल वो तया याचि वेळा । दयावया आलिंगन जिव उतावेळा वो ॥२॥
jhala virah he naye dehavari | detan voshadhe vo anitan panchakshari | devi devatanchi nachale yethen thori | nana upayanchya karita bharovari vo
झाला विरह हे नये देहावरी । देतां वोषधे वो आणितां पंचाक्षरी । देवि देवतांची नचले येथें थोरी । नाना उपायांच्या करिता भरोवरी वो ॥१॥ आण वेगिरी तो सावळा सुंदर । मदनमूर्ति वो नदाचा कुमर । तया भेटतांचि होईल उतार । पुरेल आर्त हे वाचेल सुंदर वो ॥२॥
jhali kirtanachi dati | chandrabhage valuvantin
झाली कीर्तनाची दाटी । चंद्रभागे वाळुवंटीं ॥१॥ संत गर्जती आनंदें । हरिची नामें नाना छंदें ॥२॥
jhali bhagyachi ujari | drushti dekhatanchi pandhari
झाली भाग्याची उजरी । दृष्टी देखतांचि पंढरी ॥१॥ ठेविले तो कर कटीं । जेणें अवलोकिला दिठी ॥२॥
jhalen doliyan paranen | indriyanhi puralepanen
झालें डोळियां पारणें । इंद्रियांही पुरलेपणें ॥१॥ विठो देखतांचि दिठीं । जिवीं जिवा पडली मिठी ॥२॥
jhale te te chamatkar | nirantar athavati
झाले ते ते चमत्कार । निरंतर आठवती ॥१॥ काय सांगो कोणापासी । अभाविकासी सत्य न वाटे ॥२॥
jhetimeti baige lave harichya payin | naman namratan hechi paramarthacha soi
झेटिमेटी बाईगे लवे हरिच्या पायीं । नमन नम्रतां हेचि परमार्थाचा सोई ॥१॥ निढळासी बोट लावितेसी वेळोवेळां । नमनाचि होतें सहज खेळतां या खेळा ॥२॥
tal vine mrudengesi | yeti gajarensi miravat
टाळ विणे मृदेंगेसी । येती गजरेंसी मिरवत ॥१॥ छबिने पताका गरुडटके । घेउनी हरिखें अवलोकिती ॥२॥
tipariyache ghai ge nach sukhen bai | gitin gauniyan harichen sangamasukh ghai
टिपरियाचे घाई गे नाच सुखें बाई । गितीं गाऊनियां हरिचें संगमसुख घई ॥१॥ नाचोनियां फेरि गे गुण त्याचे उच्चारी । जेणें काग बग रिठा मर्दियले वैरी ॥२॥
thayin michi nahin mhanen | harapalon bhrantigunen
ठायीं मीचि नाहीं म्हणें । हारपलों भ्रांतिगुणें ॥१॥ लोकां म्हणे धांवा धांवा । मज अपणा भेटवां ॥२॥
thayincha ha runanubandh | pritivad ubhayatan
ठायींचा हा ऋणानुबंध । प्रीतिवाद उभयतां ॥१॥ म्हणोनि एक एकाधीन । जाणती उणखूण येरयेरां ॥२॥
theuni chitta payanvarin | karin chakari manobhaven
ठेउनी चित्त पायांवरीं । करीन चाकरी मनोभावें ॥१॥ भोगवाल ते भोगीन भोग । न वंची अंग तिळतुल्य ॥२॥
theuniyan bhav tumachiye charanin | baisen shravanin vaishnav karitan kirtan
ठेऊनियां भाव तुमचिये चरणीं । बैसेन श्रवणीं वैष्णव करितां कीर्तन ॥१॥ याचिपरी सार्थक हा करीन काळ । जाऊं नेदी निर्फळ ऐसें आयुष्य नरदेह ॥२॥
theva payampashi | rahen mi savakashi
ठेवा पायांपाशी । राहेन मी सावकाशी ॥१॥ करुनियां तुमचें ध्यान । मुखीं नामाचें चिंतन ॥२॥
theval tethen rahen sukhen | yavari harikhen apuliya
ठेवाल तेथें राहेन सुखें । यावरी हरिखें आपुलिया ॥१॥ न वंची मी हे सेवेसी काया । धाडाल ठायां जाईन त्या ॥२॥
doliyachahi dola budhdi | majhi ughaduniyan krupanidhi | dekhani karuniyan trishudhda | nijatmapadin sthapili
डोळियाचाही डोळा बुध्दी । माझी उघडूनियां कृपानिधी । देखणी करुनियां त्रिशुध्द । निजात्मपदीं स्थापिली ॥१॥ तेणें दिसती ठायां ठावो । हदय सकळांचेही भाव । संत दावी जे अनुभव । आणखीही सर्व मायाकृत ॥२॥
tatvatan na kale | alen mana ten chavale
तत्वतां न कळे । आलें मना तें चावळे ॥१॥ खरियासी मानी खोटें । खोटें खया ऐसें वाटे ॥२॥
tap sadhan henchi majhen | gain tujhen nam hari
तप साधन हेंचि माझें । गाईन तुझें नाम हरी ॥१॥ आणिकां साधनीं उबग आला । विश्वास उपजला येचिविशीं ॥२॥
tamalasham rup mandit | katin miravat karambujen
तमाळशाम रुप मंडित । कटीं मिरवत करांबुजें ॥१॥ पाहतां धणी न पुरे मना । न संडे नयना निजानंद ॥२॥