भजनी मालिका
← भजनांकडे परत

झेटिमेटी बाईगे लवे हरिच्या पायीं । नमन नम्रतां हेचि परमार्थाचा सोई

jhetimeti baige lave harichya payin | naman namratan hechi paramarthacha soi

रचनाकार: संत निळोबा · अभंग
झेटिमेटी बाईगे लवे हरिच्या पायीं । नमन नम्रतां हेचि परमार्थाचा सोई ॥१॥ निढळासी बोट लावितेसी वेळोवेळां । नमनाचि होतें सहज खेळतां या खेळा ॥२॥ उत्तम हा खेळ गे खेळतां निर्मळ । नमनीं नमितां हातां येतो हा गोपाळ ॥३॥ निळा म्हणे जग तुज करिल कृपा मग । येऊनियां वास करितां ह्रदयीं श्रीरंग ॥४॥