भजनी मालिका
← भजनांकडे परत

झाला विरह हे नये देहावरी । देतां वोषधे वो आणितां पंचाक्षरी । देवि देवतांची नचले येथें थोरी । नाना उपायांच्या करिता भरोवरी वो

jhala virah he naye dehavari | detan voshadhe vo anitan panchakshari | devi devatanchi nachale yethen thori | nana upayanchya karita bharovari vo

रचनाकार: संत निळोबा · अभंग
झाला विरह हे नये देहावरी । देतां वोषधे वो आणितां पंचाक्षरी । देवि देवतांची नचले येथें थोरी । नाना उपायांच्या करिता भरोवरी वो ॥१॥ आण वेगिरी तो सावळा सुंदर । मदनमूर्ति वो नदाचा कुमर । तया भेटतांचि होईल उतार । पुरेल आर्त हे वाचेल सुंदर वो ॥२॥ येकि सखिया त्या येउनि विनविती । येकि हरिचीया पायावरी लोळती । येकि करुनि पंचप्राणातिं आरती । म्हणति चला वेगीं येकांता श्रीपति वो ॥३॥ येकी घालिती हरिसी विंझणवारा । येकि देति विडि त्या सुंदरा । येकि वारिती वरी चौया सकुमारा । ये म्हणति हरि चलावे मंदिरा वो ॥४॥ येकि देति चंदनाचि उटी । येकी लाविती कस्तुरिमळिवटी ये घालिती त्या तुळसिमाळा कंठि । येकि म्हणती चलावें जगजेठी ॥५॥ ऐसा विनउलि आणिला ऐकोनि जिविं ते सुखावलि बाळी । उठोनि सेजेवरी बैसली वेल्हाळी । निळयास्वामी तीचे आर्त पुरवि तये काळीं वो ॥६॥