तुझीये संगतीं । आम्ही लागलों नेणतीं
tujhiye sangatin | amhi lagalon nenatin
तुझीये संगतीं । आम्ही लागलों नेणतीं ॥१॥ परि तूं कृपावंत हरि । सांभाळिसी सर्वांपरि ॥२॥
tujhiye sangatin | amhi lagalon nenatin
तुझीये संगतीं । आम्ही लागलों नेणतीं ॥१॥ परि तूं कृपावंत हरि । सांभाळिसी सर्वांपरि ॥२॥
tumachin namen gaun mukhen | tumhin tin sukhen aikavin
तुमचीं नामें गाऊं मुखें । तुम्हीं तीं सुखें ऐकावीं ॥१॥ नका यासी व्यवधान । मेळवा नयन नयनासी ॥२॥
tumachiya balen tumhansaven khelaven | apalya nadaven mativaden dhanvata
तुमचीया बळें तुम्हांसवें खेळावें । आपल्या नाडावें मतिवादें धांवता ॥१॥ याचिसाठीं क्षणक्षणां विनंति करीं । ठेवावें मजवरी अवलोकन कृपेचें ॥२॥
tumache charanin rahon man | kara hen dan krupechen
तुमचे चरणीं राहों मन । करा हें दान कृपेचें ॥१॥ नामीं तुमचे रंगो वाचा । अंगीं प्रेमाचा अविर्भावो ॥२॥
tumache payin amuchen nij | nahin kaj laukikin
तुमचे पायीं आमुचें निज । नाहीं काज लौकिकीं ॥१॥ रिध्दिसिध्दी फुकासाठीं । नेघों गोठी नाईकों त्या ॥२॥
tumachya kirtanen pavalon par
तुमच्या कीर्तनें पावलों पार । भवसिंधूचा लहान थोर ।
tumachya krupamrutajalin | majhi vachanavalli ankurali | mati vistaren phankali | phal sambharin harinamen
तुमच्या कृपामृतजळीं । माझी वचनवल्ली अंकुरली । मती विस्तारें फांकली । फळ संभारीं हरिनामें ॥१॥ नवल कृपामृतधन । वरुषला तुमचें हें वरदान । माझी वाचा आणि मन । केलीं पावन कीर्तनें ॥२॥
tumachya payin jadatan man | nahin prayojan shabdanchen
तुमच्या पायीं जडतां मन । नाहीं प्रयोजन शब्दांचें ॥१॥ तरी हे कां जी चेतविली । गुणीं प्रवर्तविली मति माझी ॥२॥
tumachya payin thevitan chitta | purale het sakalahi
तुमच्या पायीं ठेवितां चित्त । पुरले हेत सकळही ॥१॥ बरवें वर्म हें हाता आलें । संतीं दिधलें दाखवूनि ॥२॥
tumachya payin thevilen man | evadhenchi dhan majapashin
तुमच्या पायीं ठेविलें मन । एवढेंचि धन मजपाशीं ॥१॥ जरी हा देव दाखवाल । अभय दयाल वचनाचें ॥२॥
tumachya payin majhen hit | hoil nishchit henchi vaten
तुमच्या पायीं माझें हित । होईल निश्चित हेंचि वाटें ॥१॥ आणखी कोणा शरण जाऊं । आहे उपाऊ तुम्हां हातीं ॥२॥
tumachya balen ni:shank manin | gaun vadanin harinam
तुमच्या बळें नि:शंक मनीं । गाऊं वदनीं हरिनाम ॥१॥ कळिकाळ तोही वंदी माथा । तुमच्या शरणागता भिऊंनियां ॥२॥
tumachyachi charanacha mahima | nena tumhi purushottama
तुमच्याचि चरणाचा महिमा । नेणा तुम्ही पुरुषोत्तमा ॥१॥ आम्हा दासांचें जीवन । घडे अमृताचेचि पान ॥२॥
tumhan amhan nitya bheti | nahin tuti kalpanti
तुम्हां आम्हां नित्य भेटी । नाहीं तुटी कल्पांती ॥१॥ प्रभा केवि सांडी भानु । हुताशनु दीपनातें ॥२॥
tumhanvin kona satta | ahe ananta yadarthi
तुम्हांवीण कोणा सत्ता । आहे अनंता यदर्थी ॥१॥ जन्ममरणा हरुनियां । करी निज छाया कृपेची ॥२॥
tumhi jana antarinche | latiken sachen shrihari
तुम्ही जाणा अंतरींचे । लटिकें साचें श्रीहरी ॥१॥ आतां माझी कांहीं नका । मनीं शंका वागवूं ॥२॥
tumhi ton krupeche sagar | pari dustar karma majhen
तुम्ही तों कृपेचे सागर । परि दुस्तर कर्म माझें ॥१॥ म्हणेनियां नये करुणा । माझिया दुर्गुणा देखोनी ॥२॥
tumhi didhalen vaikunthabhuvan | sheshashayan majalagin
तुम्ही दिधलें वैकुंठभुवन । शेषशयन मजलागीं ॥१॥ नाहीं तरी जाणता कोण । होतों निर्गुण निराभास ॥२॥
tumhi deva krupavant | amhi anath durbalen
तुम्ही देवा कृपावंत । आम्ही अनाथ दुर्बळें ॥१॥ म्हणोनियां थोरपण तुम्हां । येतें पुरुषत्तमा आमुचेनि ॥२॥
tumhi deva pratyaksha asa | pari mi kaisa olakhon
तुम्ही देवा प्रत्यक्ष असा । परि मी कैसा ओळखों ॥१॥ जेव्हां प्रगटोनि भेटी दयाल । तेव्हांचि फावाल सुरवाडें ॥२॥