भजनी मालिका
← भजनांकडे परत

तुम्ही तों कृपेचे सागर । परि दुस्तर कर्म माझें

tumhi ton krupeche sagar | pari dustar karma majhen

रचनाकार: संत निळोबा · अभंग
तुम्ही तों कृपेचे सागर । परि दुस्तर कर्म माझें ॥१॥ म्हणेनियां नये करुणा । माझिया दुर्गुणा देखोनी ॥२॥ नेणें जप तप ध्यान कांहीं । पडिलों प्रवाहीं प्रपंचा ॥३॥ निळा म्हणे केली सेवा । माझी हे देवा न पावेचि ॥४॥